ओसाका
ओसाका : जपानचे टोकिओखालोखाल मोठे शहर. लोकसंख्या २९,८०,४८७ (१९७०). हे दक्षिण होन्शू बेटातील ओसाका प्रांताच्या राजधानीचे शहर असून ओसाका उपसागरावर, योडो व तिच्या उपनद्या यांच्या त्रिभुज प्रदेशभर पसरलेले आहे. लहानमोठ्या नद्याकालव्यांचे जाळेच शहरभर पसरलेले असल्याने दळणवळण व वाहतुकीच्या सोयीं साठी हजारावर पूल बांधून शहराचे निरनिराळे भाग जोडावे लागले आहेत.